Thursday, February 19, 2026

पारनेरकरांना आनंदाची बातमी ; शहराच्या डी.पी.आर मंजुरीबरोबरच २ कोटींच्या विकासकामांचा शासननिर्णय

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करणारे कार्यतत्पर नेतृत्व

पारनेर शहराच्या डी.पी.आर मंजुरीबरोबरच पारनेर शहरातील २ कोटींच्या विकासकामांचा शब्द देताना आज प्रत्यक्षात शासननिर्णयाच्या माध्यमातून सदर विकासकामांना मंजुरी घेत सुजित झावरे पाटलांनी परत एकदा पारनेरकरांना दिली आनंदाची बातमी…

पारनेर / प्रतिनिधी आपल्या कार्यकर्तृत्वाने सर्वसामान्य जनतेच्या हृदयात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांनी गेल्याच आठवड्यात पारनेर शहरवासीयांना दिलेला शब्द पाळत वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत पारनेर शहरातील रस्ता विकास कामे व स्मशानभूमी विकासकामाकरिता सुमारे २ कोटी रुपयांच्या निधीला महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मंजुरी मिळविली असून त्याबाबतचे शासननिर्णय देखील सुजित झावरे पाटील यांना शासनस्तरावरुन प्राप्त झाला आहे…नववर्षाच्या पूर्वसंध्येला पारनेर शहराच्या विकास आराखड्याबरोबरच (डी.पी.आर.) मंजुरी सोबत २ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी व त्याबाबतचा शासन अध्यादेश असा डबल धमाका एका आठवड्याच्या आत सुजित झावरे पाटील यांनी केला असून समस्त पारनेर शहरवासीयांना त्यांनी नवीन वर्षाची अभूतपूर्व भेट दिल्याचे मानले जात आहे….

या वैशिष्टपूर्ण निधी अंतर्गत

१) पारनेर जामगाव रस्ता ते बुगेवाडी,सोबलेवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे – ५० लक्ष

२) पारनेर ते सिध्देश्वरवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे – ५० लक्ष

३) पारनेर कान्हूर रोड ते दशक्रिया विधी रस्ता काॅक्रिटीकरण करणे – ५० लक्ष

तसेच पारनेर नगरपंचायत हद्दीतील स्मशानभूमी विकास करणे या कामासाठी ५० लक्ष रुपये असा एकूण २ कोटी रुपयाचा निधी ना.एकनाथजी शिंदे साहेबांनी अवघ्या आठ दिवसात मंजूर करुन त्याबाबतचा शासननिर्णय आज काढून ६ नोव्हेंबरच्या मेळाव्यात सुजित झावरे पाटील व समस्त पारनेरवासीयांना दिलेला शब्द खरा करुन दाखविला आहे…

यावेळी बोलताना शिवसेना नेते सुजित झावरे पाटील म्हणाले अवघ्या एक महिन्यापूर्वी आमचे नेते लाडके उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेबांनी पारनेरवासीयांना दिलेला शब्द पूर्ण करतानाच पारनेर नगर तालुक्यातील रखडलेल्या विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे आश्वासन दिले असून कुठलीही राजकीय महत्वकांक्षा न ठेवता मी स्वतः तालुक्यातील विकासकामांसाठी सदैव प्रयत्नशील असणार आहे…

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles