Friday, February 20, 2026

नगर मनमाड रस्त्याचे काम सुरू ; महामार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

अहिल्यानगर कडुन मनमाडकडे जानारी वाहतुक पर्यायी मार्गाने वळविले बाबात.
अहिल्यानगर मनमाड मार्गावरील सावळीविहीर ते विळदघाट दरम्यान सुमारे ७५ किं.मी. अंतराच्या मार्गाचे
कॉक्रीटीकरणाचे व दुरुस्तीचे कामकाज दि. १२/०९/२०२५ रोजी पासुन सुरु झालेले आहे. सदर मार्गावरुन मोठ्या
प्रमाणात अवजड वाहतुक होत असल्याने व राष्ट्रीय महामार्ग ७५२ आय एस क्लब (छत्रपती संभाजीनगर) – लासूर
वैजापुर- पुणतांबा फाटा (कोपरगाव) अंतर्गत मौजे संवत्सर ता. कोपरगाव येथील गोदावरी नदी वरील मोठा पुल
धोकादायक स्थितीमध्ये असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन प्राणांकित किंवा गंभिर अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा
प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरीता अहिल्यानगर मनमाड मार्गावरील विळदघाट ते
सावळीविहीर कडे जाणारी एक लेन अवजड वाहतुकी करीता बंद करुन अहिल्यानगर कडुन मनमाडकडे जाणारे अवजड
वाहतुक विळद सर्कल शेंडी बायपास- नेवासा- गंगापुर वैजापुर मार्गे मनमाड या पार्यायी मार्गाने वळविणे व
अहिल्यानगर कडून संगमनेर नाशिक कडे जाणारी सर्व अवजड वाहतुक कल्याण बायपास आळेफाटा संगमनेर मार्गे
दिनांक १२ / ११ / २०२५ रोजीचे २०.०० वा. पासुन ते दिनांक ११/१२/२०१५ रोजीचे २०.०० वा. पर्यंत
जिल्हादंडाधिकारी सो. अहिल्यानगर यांचे अदेशान्वये वळविण्यात आलेली आहे.
१) अहिल्यानगर कडुन, राहुरी शिर्डी, मनमाड, मालेगाव, धुळे कडे जाणारे वहतुकीसाठी पर्यायी मार्ग

विळद सर्कल – दुधडेरी चौक शेंडी बायपास नेवासा फाटा कायगाव टोके गंगापुर वैजापुर मार्ग
इच्छितस्थळी जातील
२) अहिल्यानगर कडून संगमनेर नाशिक कडे जाणारे सर्व अवजड वहतुकीसाठी पर्यायी मार्ग
कल्याण बायपास आळेफाटा- संगमनेर मार्गे इच्छित स्थळी जातील
प्रस्तुत आदेश शासकीय वाहने, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने
परवानगी दिलेल्या वाहनांना लागु राहणार नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles