Tuesday, October 28, 2025

नेप्ती सेवा सोसायटीच्या संचालकपदी अंबादास जपकर यांची बिनविरोध निवड

नेप्ती सेवा सोसायटीच्या संचालकपदी अंबादास जपकर यांची बिनविरोध निवड
ग्रामस्थ व संचालक मंडळाच्या वतीने सत्कार
शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करणार -अंबादास जपकर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती सेवा सोसायटीच्या रिक्त संचालकपदी अंबादास दशरथ जपकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोसायटीचे तत्कालीन संचालक कै. दशरथ तुकाराम जपकर यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यांचे चिरंजीव अंबादास जपकर यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या निवड प्रक्रियेसाठी मंदाकिनी ठोकळ यांनी निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. चेअरमन सुरेंद्र होळकर यांनी अंबादास जपकर यांचे नाव सुचविले तर जालिंदर शिंदे यांनी अनुमोदन दिले. कुणीही विरोध न केल्याने जपकर यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.
यावेळी ग्रामस्थ व सोसायटीच्या संचालक मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित अंबादास जपकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच विठ्ठलराव जपकर, माजी सरपंच संजय आसाराम जपकर, माजी पंचायत समिती सदस्य देवा होले, शिवाजी होळकर, नितीन कदम, मार्केट कमिटी सदस्य वसंत पवार, सरपंच अशोक जपकर, माजी सरपंच दिलीपराव होळकर, उपसरपंच एकनाथ आसाराम जपकर, रामदास फुले, माजी उपसरपंच दादू चौगुले, बंडू जपकर, संभाजी गडाख, फारुक सय्यद, बाबासाहेब होळकर, सेवा सोसायटीचे चेअरमन सुरेंद्र होळकर, व्हाईस चेअरमन सादिक पवार, संचालक मच्छिंद्र होळकर, विलास जपकर, दादाभाऊ होळकर अशोक जपकर, राजाराम जपकर, राजेंद्र जपकर, जालिंदर शिंदे, उमर सय्यद, मुक्ता कांडेकर, रोहिणी होळकर, जमीर सय्यद, सुरेश कदम, मल्हारी कांडेकर, भाऊसाहेब होळकर, बापू जपकर, अशोक जपकर, भास्कर जपकर, शांताबाई जपकर, अतुल जपकर, सुभाष जपकर, गोरख जपकर, रामदास जपकर, भीमराज जपकर, सोसायटीचे सचिव भाऊसाहेब कुंठाळे, माजी चेअरमन भास्कर जपकर, नंदकुमार जपकर, राजेंद्र चत्तर, बाजीराव चत्तर, विजय जपकर, कचरू जपकर, अजय जपकर, ज्ञानेश्‍वर जपकर, नंदू जाधव, सोमनाथ जपकर आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित अंबादास जपकर म्हणाले की, माझे वडील कै. दशरथ तुकाराम जपकर यांनी नेहमीच गावाच्या, शेतकऱ्यांच्या आणि सोसायटीच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीही सोसायटीच्या कामात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा जपत कार्य करणार आहे. माझी ही निवड बिनविरोध झाल्याने मला सर्वांचा विश्‍वास लाभला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी कर्ज, खत, बियाणे, तसेच अन्य सुविधा वेळेवर उपलब्ध करून देणे, सोसायटीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवणे, नवीन पिढीला रोजगार व मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रयत्न करण्याचे ध्येय असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक सावळेराम जपकर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles