केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्या खासदाराला फोन करून शुभेच्छा दिल्याने हिंगोलीमध्ये एकच चर्चा सुरू झाली. अमित शाह यांची कोणती राजकीय खेळी आहे का? अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांचाही रविवारी ६५ वा वाढदिवस होता, पण शाह यांच्याकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या नाहीत. पण हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना अमित शाह यांनी स्वत: फोन करून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा २७ जुलै रोजी वाढदिवस झाला. कार्यकर्त्यांनी आष्टीकर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. आष्टीकर याना गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिंगोलीमध्ये ठाकरे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे. अमित शाह कोणती राजकीय खेळी करणार का? असा काहींचा सूर हिंगोलीमध्ये ऐकायला मिळत आहे. या घटनेमुळे ठाकरे गटातील अंतर्गत राजकारणावर आणि भाजपच्या आगामी रणनीतीवर चर्चा रंगली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी हिंगोलीचे ठाकरेंचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नागेश पाटील समर्थकांनी शुभेच्छांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच तो व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नसतानाच अमित शाहांनी नागेश पाटीलांना शुभेच्छा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.


