Thursday, February 19, 2026

शिंगणापूर पोलीस ठाण्याचा एक कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

सोनई-शिंगणापूर पोलीस ठाण्यासमोरील गाळामालकाकडून तीन हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून शिंगणापूर पोलीस ठाण्याचा एक कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. शिंगणापूर येथे पुजा साहित्याची खरेदी करता भाविकांची वाहने ठराविक दुकानात लावण्यासाठी दोन महिन्यांचे मिळून तीन हजारांची मागणी पोलीस कर्मचार्‍याने गाळा मालकाकडे केली व त्यातील दोन हजार रुपये देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

पोलिसांकडून याप्रकरणी गुप्तता पाळली जात असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे खात्रीलायक समजले आहे. शिंगणापूर येथे भाविकांचे फसवणूकीचे प्रमाण वाढत असल्याने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी भाविकांच्या सुरक्षा व सोयीच्या दृष्टीने कडक पावले उचलली व भाविकांना त्रासदायक ठरणार्‍या लटकूंचा बंदोबस्त करण्याची उपाययोजना केली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles