Saturday, December 13, 2025

नगर बाजार समितीच्या नेप्ती मार्केटमधील कांदा व्यापार्‍याला घातला तब्बल ८१ लाख ६७ हजारांना गंडा

अहिल्यानगर – नगर बाजार समितीच्या नेप्ती मार्केटमधील कांदा व्यापार्‍याची आंध्र प्रदेशातील व्यापार्‍याने कांदा खरेदी करून त्याचे पैसे न देता ८१ लाख ६७ हजार २४० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार ३० नोव्हेंबर २०२४ ते ८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात १२ डिसेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विकास किशोर वाघ (वय ३५, रा. वाघ गल्ली, नालेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे नेप्ती मार्केटमध्ये कांदा व्यापारी आहेत. त्यांची आंध्र प्रदेश येथील परमात्मा मारीशेट्टी या व्यापार्‍याशी ओळख झाली होती. अनेक दिवस त्यांच्यात कांदा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याने मारीशेट्टी याने फिर्यादी वाघ यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत मारीशेट्टी याने मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी केली. त्याच्या मागणीप्रमाणे वाघ यांनी या कालावधीत जवळपास २ कोटी २९ लाख ६८ हजार २५१ रुपये किंमतीचा कांदा मालट्रकने नेप्ती मार्केट येथून आंध्र प्रदेशात मारीशेट्टी याच्याकडे पाठविला होता.

त्यापैकी त्याने १ कोटी ४८ लाख १ हजार ११ रुपये फिर्यादी वाघ यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर पाठविले. उर्वरित ८१ लाख ६७ हजार २४० रुपये दिले नाही. त्याला या पैशाबाबत वेळोवेळी मागणी केली असता त्याने आज देतो, उद्या देतो, असे सांगून वेळकाढूपणा केला. त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांनी त्या पैशांची मागणी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवून टाळाटाळ करु लागला. त्यानंतर आजपर्यंत त्याने ते पैसे दिले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर वाघ यांनी १२ डिसेंबर रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी परमात्मा मारीशेट्टी याच्याविरुद्ध बीएनएस कलम ३१८ (४), ३१६ (२

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles