Tuesday, March 17, 2026

कीर्तनकार यशवंत थोरात विरोधात पारनेर तालुक्यात संताप ;गावकऱ्यांची मोठी मागणी

पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावात कीर्तनकार यशवंतर थोरात याने अल्पवयीन मुलीच्या केलेल्या शोषणावर संताप व्यक्त केला. या घटनेमुळे गावात संतापाची लाट असून, आज गावकऱ्यांनी संपूर्ण गाव बंद ठेवत निषेध केला.

शाळकरी विद्यार्थिनींनी यशवंत थोरात याच्या प्रतिमेला जोडे मारून लाथ्यांनी तुडव तुडव तुडवले. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर यशवंत थोरात याचा महिलांनी पुतळा जाळला.

पारनेर इथल्या श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज याने चार वर्षांपासून अल्पवयीन मुलीचं शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारामुळे राज्यातील वारकरी संप्रदायक हादरला आहे.

अत्याचार करताना नराधम यशवंत थोरात हा अल्पवयीन मुलीचा अमानुष छळ केला. तिला चटके दिले. मुलीला चालता येणार नाही, अशी मारहाण केली. मुलीने घरच्यांना सांगू नये म्हणून, तिच्यावर पाळत ठेवायचा, जीवे मारण्याची धमकी द्यायचा, या शोषणाला कंटाळलेल्या पीडितेने घरच्यांना माहिती दिली. यानंतर यशवंत थोरात याला पोलिसांनी अटक केली.

यशवंत थोरात याच्या कृत्याचा निषेधार्थ आज पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावात संतापाची लाट उसळली. गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिलांना एकत्र येत, निषेध व्यक्त केला. गाव बंद ठेवत, त्याचा पुतळा जाळला. यशवंत थोरात महाराज याला फाशीची शिक्षा व्हावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी केली.यशवंत थोरात महाराजविरोधात याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी आहे. त्याच्याविरोधात पूर्वीचे दोन गुन्हे दाखल आहेत. या घटनेच्या तपासाबरोबर, त्या केसेसची पु्न्हा तपास करून, नराधमाला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवावे, अशी मागणी संतप्त महिलांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles