Saturday, February 21, 2026

अहिल्यानगरसह २९ महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर

राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 29 महापालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते 50 टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे. तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे. महिलांना असलेल्या 50 टक्के आरक्षणानुसार, 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला , तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे. राज्यातील 29 महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान झालं होतं. तर 16 जानेवारीला मतमोजणी झाली होती. कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे, याबाबतची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे आहे.

महाराष्ट्रातील 29 महापौरपदांसाठी आरक्षण-
अनुसूचित जमाती – 1
अनुसूचित जाती – 3
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – 8
सर्वसाधारण – 17

बृहन्मुंबई (BMC) –

ठाणे – SC प्रवर्ग (अनुसूचित जाती)

कल्याण-डोंबिवली – एसटी प्रवर्ग (अनुसूचित जमाती)

नवी मुंबई –

मिरा-भाईंदर –

उल्हासनगर –

वसई-विरार –

भिवंडी-निजामपूर –

पुणे –

पिंपरी-चिंचवड –

नाशिक –

नागपूर –

कोल्हापूर – ओबीसी प्रवर्ग

सांगली-मिरज-कुपवाड –

सोलापूर –

अमरावती

अकोला – ओबीसी प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

नांदेड-वाघाळा

परभणी

मालेगाव

अहिल्यानगर – ओबीसी प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

धुळे

चंद्रपूर – ओबीसी महिलांसाठी राखीव

लातूर – SC प्रवर्ग (अनुसूचित जाती, महिलांसाठी राखीव)

जळगाव – ओबीसी महिलांसाठी राखीव

छत्रपती संभाजीनगर –

मीरा-भाईंदर (दुहेरी नाही)

जालना – SC प्रवर्ग (अनुसूचित जाती, महिलांसाठी राखीव)

इचलकरंजी – ओबीसी प्रवर्ग

पनवेल – ओबीसी प्रवर्ग

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles