Saturday, February 21, 2026

एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; वेतन वाढीचे थकीत हप्ते कधी मिळणार? तारीख आली समोर

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासन कटिबद्ध

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली ग्वाही

शासनाने १०० कोटी रुपये तातडीने अदा केले

एसटीच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत देण्यात येणारा वेतन वाढीचा थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बॅक खात्यात जमा होईल. परिवहन मंत्री अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याविषयी माहिती दिली आहे. यामुळे येत्या २४ फेब्रुवारीला काही कामगार संघटनांनी पुकारलेले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन देखील सरनाईक यांनी केलंय.

‘एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढीच्या थकीत हप्ता देण्यासाठी महामंडळाकडे पैसे नसल्याने शासनाने ती जबाबदारी उचलावी. याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केली होती. या बैठकीत ठरल्यानुसार दरमहा सुमारे ६५ कोटी रुपये शासनाने अनुदान स्वरूपात एसटीला देण्याचे ठरले होते, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत हप्ते डिसेंबर महिन्याच्या वेतनासोबत देण्यास सुरुवात झाली. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत सदर हफ्ता देण्यासाठी महामंडळाकडे पुरेसा निधी उपलब्ध नव्हता. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे हप्ते थकले होते. परंतु थकीत हप्ता न मिळाल्याने फसवणूक झाल्याची भावना एसटी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्ती केली होती.

थकीत हप्ते मिळवण्यासाठी काही कामगार संघटनांनी आंदोलनाच्या पवित्रा घेतला होता. आंदोलनाचा पवित्रा स्वीकारल्याने त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचीशी चर्चा केली. त्यानंतर या थकीत हप्त्यापोटी २१० कोटी रुपये तातडीने सरकारने एसटीला द्यावेत, अशी विनंती मंत्री सरनाईक यांनी केली.

कर्मचाऱ्यांचे २१० कोटी रुपयांपैकी १०० कोटी रुपये आज शासनाने दिले आहे. तसेच उर्वरित निधी देखील लवकरच प्राप्त होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचे हप्ते कोणते परिस्थितीमध्ये देण्यात येतील, असे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिलं आहे. दहावी आणि बारावीच्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यांच्या प्रवासात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी संघटनांनी आंदोलन स्थगित करावं, असे आवाहन देखील त्यांनी केलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles