Thursday, February 19, 2026

अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे छापे, अनेकांची चौकशी

अहिल्यागरच्या मुकुंदनगमध्ये ATS चे छापे, तलवारी जप्त
अहिल्यानगर – राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून (ATS) अहिल्यानगरमधील मुकुंदनगरसह राज्याच्या विविध जिल्ह्यांत २१ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे., काल रात्रीपासून ही छापेमारी सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही. मुकुंदनगरमध्ये सात ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून चौकशी केली आहे.
यासंबंधी एटीएसने माहिती दिली की, १४ फेब्रुवारी २०२६ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने वॉरंटच्या आधारे अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण १२ ठिकाणी छापे टाकले. याव्यतिरिक्त, यवतमाळ जिल्ह्यात, पुसद आणि उमरखेडमध्ये १४ संशयितांची सखोल चौकशी सुरू आहे. अहिल्यानगरमधील कारवाईदरम्यान, तलवारी जप्त करण्यात आल्या. कारवाईचा भाग म्हणून आक्षेपार्ह कागदपत्रे, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि सीसीटीव्ही उपकरणे देखील तपासली जात आहेत.या कारवाईत आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही आणि संशयितांची सविस्तर चौकशी सुरू आहे.

याशिवाय यवतमाळमध्ये पुसद आणि अकोला उमरखेडमध्येही छापे घालण्यात आले आहेत. एकाचवेळी ही पथके ठिकठिकाणी पाठविण्यात आलेली आहेत. एटीएसला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. मात्र, आतापर्यत अनेक घऱांत जाऊन पोलिसांनी चौकशी केली आहे. स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे.

दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात एटीएसची 20 पथक दाखल झाले आहेत. एटीएसकडून उमरखेड, पुसदमध्ये संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या कारवाईत वरिष्ठ आयपीएस अधिकारी ही सहभागी झाले आहेत. राज्यात एटीएएसने रात्रभर गोपनीय कारवाई केली. उमरखेड आणि पुसदमध्ये एटीएसचे 20 पथक तळ ठोकून आहेत. रात्री त्यांनी अनेकांची चौकशी केली. तर काही तरुणांना, संशयितांना ताब्यात घेतले आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात रात्रभर कारवाई करण्यात आली. ही कारवाई अत्यंत गोपनिय पद्धतीने करण्यात आली. रात्री अनेकांची चौकशी करण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles