Friday, October 31, 2025

नगर शहर विधानसभेची जागा काँग्रेसलाचं मिळेल या फसवणूक प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजूर

“नगर शहर विधानसभेची जागा काँग्रेसलाचं मिळेल या फसवणूक व विश्वासघात प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजूर”
#अहिल्यानगर – राष्ट्रीय काँग्रेसच्या ओबीसी विभागच्या राष्ट्रीय समन्वयक सौ मंगल भुजबळ यांना युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरद पवार पक्षाचे) उपाध्यक्ष बाळराजे उर्फ श्रीकृष्ण वसंतराव तौर पाटील यांनी भुजबळ यांना फोन करून विधानसभा निवडणुकीत नगर शहराची जागा काँग्रेसला सुटणार असून तुम्हाला राष्ट्रवादी शरद पवार गट पार्टीला फंड दयावा लागेल व त्यासाठी टोकन म्हणून तुम्हाला दीड लाख रुपये द्यावे लागतील. असे सांगून वेळ कमी आहे तुम्ही ताबडतोब मी दिलेल्या बँक अकाउंटवर दीड लाख पाठवा पैसे अकाउंटला जमा zhale तरच तुमच्या नावाची चर्चा मीटिंग मध्ये होईल असे आरोपीने सांगितले त्यामुळे भुजबळ यांनी जागा काँग्रेसला मिळेल या आशेने आरोपी बाळ राजे यांच्यावर विश्वास ठेवला व आरोपी बाळराजे यांनी सांगितलेल्या राजे जाधव उदयसिंह सत्यजित यांचे नावावर दीड लाख रुपये गुगल पे अकाउंट वर पाठवले परंतु पुढे फिर्यादी मंगल भुजबळ यांना अहिल्यानगर मतदारसंघासाठी उमेदवारी मिळून न देता त्या मतदारसंघात अभिषेक कळमकर यांना विधानसभेची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी देण्यात आली. फिर्यादी मंगल भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाली असे लक्षात आल्याने फिर्यादी यांनी आरोपी बाळराजे यांना दिलेल्या दीड लाख रुपये रकमेची ५/११/२४ रोजी मागणी केली असता आरोपीने ती रक्कम देण्याचे टाळले. आरोपीने फिर्यादी मंगल भुजबळ यांची फसवणूक विश्वासघात केला म्हणून शेवटी फिर्यादी हिने आरोपी बाळराजे विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनला 12 मार्च 2025 ला लेखी फिर्याद दिल्याने कोतवाली पोलीस यांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) आणि३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला या प्रकरणातील आरोपी याने अटकपूर्वक जामीन मिळवण्यासाठी क्रिमिनल जामीन अर्ज ४२३/२५चा जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन यांच्याकडे दाखल केला असता न्यायालयाने उभय बाजूचा युक्तीवाद ऐकून घेऊन व गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अर्जदार आरोपी बाळराजे याचा अटकपूर्व जामीन नुकताच जिल्हा न्यायाधीश एम एच शेख यांनी नाममंजुर केला असून आरोपीला चौकशी साठी पोलीस कस्टडीची आवश्यकता असल्याचे कोर्ट आदेशात म्हटले आहे. या महत्त्वपूर्ण प्रकरणात सरकार पक्षातर्फे सीडी कुलकर्णी वकील साहेब यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे एडवोकेट एस एस जगदाळे यांनी काम पाहिले..
मा. संपादक,

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles