राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवट दिवस आहे. मात्र, काँग्रेसने कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, अशी भूमिका घेतल्याने बारामतीत पोटनिवडणूक होणार, मतदान होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तरीही उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी आणखी काही घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यातच, आज बारामतीच्या पोटनिवडणुकीत 6 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातून आज 4 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याची माहिती आहे.
बारामती पोटनिवडणुकीमध्ये आजच्या दिवशी सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, अंतिम आकडेवारी यायला वेळ लागणार असून अद्याप दुपारी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे, आज आणखी किती उमेदवार अर्ज माघारी घेतात हे उशिरा कळणार आहे. अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असणार आहे, त्यामुळे बारामतीत उद्या मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात. येथे एकूण 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते, त्यातील सहा जणांनी आत्तापर्यंत माघार घेतले आहे. त्यामुळे, सध्या 47 उमेदवार रिंगणार आहेत. तर, अहिल्यानगरमध्ये 18 उमेदवार रिंगणात उरले आहेत. दरम्यान, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला असून त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने उमेदवार दिला आहे. काँग्रेसने आकाश मोरे यांना तिकीट दिलं असून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
राहुरी पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दुसऱ्या दिवशी चार उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे 18 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत, उद्या गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे, मोठ्या राजकीय हालचाली घडू शकतात. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दोन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर मविआतील ठाकरे सेनेचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे, या उमेदवारांचा नेमका काय निर्णय होतो ते देखील पाहावं लागेल. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून येथे उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे, भाजप महायुतीचे अक्षय कर्डीले विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंदराव मोकाटे यांच्यात थेट लढत होणार आहे.
दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात तब्बल सध्या 47 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, भाजप सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची यांनी दिली


