सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा २०२६पासून सुरू आहेत. अर्जुन तेंडुलकर सानिया चंडोकबरोबर लग्न करणार आहे आता सचिन तेंडुलकरने पोस्ट शेअर करत लग्न होणार असल्याच्या चर्चांवर शिक्कमोर्तब केला आहे.
अर्जुन तेंडुलकर व सानिया चंडोक यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये खाजगी सोहळ्यात साखरपुडा केला होता. दोन्ही कुटुंबीय व जवळचा मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. तेंडुलकर व चंडोक कुटुंबियांनी गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर आता २०२६ मध्ये लग्नसोहळा पार पडणार आहे. यासाठी तेंडुलकर व चंडोक परिवार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रित करण्यासाठी गेले होते. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक ५ मार्च २०२६ रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. लग्नापूर्वीचे विधी ३ मार्चपासून सुरू होतील. तर ४ मार्चला होळीचा सण देखील असणार आहे,
सानिया चंडोक ही एक यशस्वी उद्योजिका आहे. ती मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. सानिया पेट केअर ब्रँडची मालकिणदेखील आहे आणि ती तेंडुलकर कुटुंबाला खूप काळापासून ओळखते. सानिया ही सारा तेंडुलकर व अर्जुनची बालपणीची मैत्रिणदेखील आहे.


