Friday, October 31, 2025

श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांना न्यायालयाकडून पकड वॉरंट

श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि साईकृपा शुगर अ‍ॅण्ड अलाईड लिमिटेड, हिरडगावचे तत्कालीन अध्यक्ष आ. विक्रमसिंह बबनराव पाचपुते आणि कारखान्याचे व्यवस्थापक यांना धनादेश अनादरप्रकरणी श्रीरामपूर न्यायालयाने पकड वॉरंट बजावले आहे. श्रीगोंदा पोलिसांकडून वॉरंट बजावणी होत नसल्याने ते न्यायालयात उपस्थित राहत नाहीत.श्रीरामपूरमधील अशोक सहकारी साखर कारखान्याला दिलेला 20 लाख रुपयांच्या धनादेश अनादर प्रकरणात श्रीरामपूर न्यायदंडाधिकारी क्रमांक दोन याच्यांसमोर सुरू असलेल्या दाव्यात साईकृपाचे तत्कालीन अध्यक्ष म्हणून आ. विक्रम पाचपुते आणि कारखाना व्यवस्थापक यांना पकड वॉरंट बजावण्यात आले आहे. श्रीरामपूर न्यायालयाने श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांना दोघांना पकडून न्यायालयासमोर उपस्थित करण्याचा आदेश दिला आहे.

दरम्यान, माजी आ.बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबाचा मालकी हक्क राहिलेला आणि आता गौरी शुगरचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील यांच्याकडे असलेला हिरडगावच्या साईकृपा साखर कारखान्याच्य जुन्या अडचणी अद्यापही पाचपुते कुटुंबाची पाठ सोडतांना दिसत नाहीत. आ. विक्रम पाचपुते आणि कारखान्यांचे व्यवस्थापक धनादेश अनादर प्रकरणात न्यायदंडाधिकारी वर्ग न्यायालय क्रमांक दोन यांनी पकड वॉरंट बजावले आहेत. श्रीगोंदा पोलिसांनी या दोघांना पकडून माझ्यासमोर हजर करावे. यात कोणतीही चूक होता कामा नयेत, असे पकड वॉरंटमध्ये म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles