आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले,पीडित महिलांचं जीणं मुश्कील

विकृत भोंदूबाबा अशोक खरात याने लैंगिक अत्याचार केलेल्या अनेक महिलांची मनस्थिती सध्या प्रचंड बिघडल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशोक खरातच्या केबिनमधील  काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये अशोक खरात या महिलांशी लैंगिक संबंधठेवताना दिसत आहे. यापैकी अनेक व्हिडीओंमध्ये महिलांचे चेहरे दिसत असून बहुतेक महिलांची ओळख उघड होत आहे. पोलिसांनी  गुन्हा दाखल करण्याचा इशारा देऊनही हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. या सगळ्यामुळे पिडीत महिलांना जबर मानसिक धक्का बसल्याची माहिती आहे.

अशोक खरात प्रकरणातील आठ ते नऊ पीडित महिलांनी मानसोपचार तज्ञांची भेट घेतल्याची माहिती आहे. अशोक खरात याच्यासोबतचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या महिला सध्या प्रचंड नैराश्याच्या भरात असून त्यांना एकटे पडल्याची भावना सतावत आहे. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या  विशेष तपास पथकाकडून महिलांना कोणतेही दडपण घेऊ नये, तसेच त्या पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही देण्यात आली आहे. तसेच तुम्हाला न्याय नक्की मिळेल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर पीडित महिलांनी मानसोपचार तज्ञांकडे धाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणात पिडीत महिलांची ओळख उघड होऊ नये, यादृष्टीने खबरदारी घेण्यासोबत पोलिसांकडून या महिलांची चौकशी अज्ञातस्थळी केली जात आहे. भोंदू अशोक खरात आणि पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. तसे सायबर पोलिसांकडून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर सातत्याने नजर ठेवली जात आहे. अशोक खरात प्रकरणाचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) एक मोठा धक्का बसला आहे. अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन हा फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच अशोक खरात याच्या मुलाची पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यानंतर त्याला घरी सोडण्यात आले होते. मात्र, आता त्याचा फोन नॉट रिचेबल असल्याने तो पळून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात यापूर्वीच फरार झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles