Wednesday, March 18, 2026

58 बायका, 58 ते व्हिडीओ! पॉर्न अ‍ॅडिक्ट की ज्योतिषी? ऑफिस बाहेर लोकांच्या रांगा तरीही महिलेसोबत…

अशोक खरातचा दावा आहे की, ते मर्चंट नेव्हीचे निवृत्त अधिकारी आहेत. २२ वर्षे सेवेत असताना त्यांनी अनेक देशांची सफर केली आहे.अशोक खरात यांनी निवृत्तीनंतर ब्रह्मांडाच्या उत्पत्ती आणि रचनेचा अभ्यास केल्याचा दावा केला. तसेच ज्योतिष क्षेत्रात सुवर्ण पदक जिंकल्याचे सांगितले. ते स्वतःला ज्योतिष आणि अंकशास्त्राचे तज्ज्ञ म्हणवत होते.अशोक खरात ‘शिवनिका ट्रस्ट’चे प्रमुख आहेत आणि ईशानेश्वर मंदिराचे व्यवस्थापनही पाहत होते. अनेक सेलिब्रिटींपासून ते राजकीय मंडळींपर्यंत अनेकजण त्यांच्यासमोर माथा टेकवायचे. पण एका महिलेने केलेल्या आरोपामुळे ते चर्चेत आले आहेत.अशोक खरात यांच्यावर 35 वर्षीय महिलेने ‘नोव्हेंबर 2022 ते डिसेंम्बर 2025 या काळात मंत्र तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली मनात विश्वास निर्माण करत फायदा घेतल्याचे म्हटले.

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांनी सांगितले की, “सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल झाला असून, गुन्हे शाखा युनिट एक कडून तपास सुरु आहे. महिलेने अशोक खरात याच्याविरुद्ध शारीरिक शोषणाची तक्रार दिल्यांनतर त्याआधारे गुन्हा दाखल करुन तपास सुरु आहे. आज तपासाचा पहिला दिवस असून, खरात याच्याविरुद्ध आतापर्यंत एकाच महिलेने तक्रार दिली आहे. त्यामुळे आणखी काही महिला तक्रारीसाठी पुढे येऊ शकतात”, असे त्यांनी म्हटले.पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या प्रदीर्घ कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील ‘ओकस प्रॉपर्टीज’च्या कार्यालयात घडला. संशयित आरोपी खरातने पीडित महिलेचा धार्मिक विश्वास संपादन केला होता. त्यानंतर तिला मंत्र-तंत्राच्या विधीसाठी बोलावून गुंगीकारक पदार्थ मिश्रित पाणी दिले. महिला संमोहित अवस्थेत असताना, तिला तिच्या पतीच्या मृत्यूची भीती दाखवून आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी खरात विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ७४, ३५२, ३५१(१) सह अत्यंत कडक अशा ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमा’ अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles