Thursday, March 19, 2026

राज्यात खळबळ ……. तर फडणवीस सरकार कोसळेल, खासदारानं ५६ व्हिडिओचा केला उल्लेख

नाशिकच्या भोंदूबाबाच्या प्रकरणाने बुवाबाजी आणि त्याआड होत असलेल्या शोषणाच्या काळीज पिळवटणाऱ्या कथा समोर येत आहे. तर या भोंदूबाबाचे राजकीय कनेक्शन उघड झाल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या सर्व प्रकारावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. चाकणकर या भोंदूबाबाचे पाद्यपूजन करत असल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर राऊतांनी त्यांच्यावर टीका केली. चाकणकर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची मागणी संजय राऊत यांनी केली.

भोंदूबाबा खरात प्रकरणात पोलिसांनी व्हिडिओ बाहेर आणले तर महाराष्ट्रातील सरकार कोसळेल असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. खरात याचे ५६ व्हिडिओ पोलिसांकडे आहेत, त्यामध्ये भाजपच्या बड्या नेत्यांचाही समावेश असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. जर पोलिसांनी हे व्हिडिओ समोर आणले तर राज्यातील सरकार कोसळेल असे ते म्हणाले आहे. अमेरिकेतील एपस्टिनपेक्षाही हे प्रकरण मोठं आणि गंभीर असल्याचा दावा राऊतांनी केला आहे.

बोंदू बाबा खरात प्रकरणात शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजप आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. खरात यांच्या मोबाईलमधील व्हिडिओ आणि फोटो समोर आले, तर महाराष्ट्रातील सरकार कोसळेल, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, “ज्या प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो माझ्यासमोर आले आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते की हे प्रकरण ‘जेफ्री एपस्टीन’ प्रकरणापेक्षाही भयंकर आहे. माझ्याकडे अनेक व्हिडिओ आणि फाईल्स आल्या आहेत, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी पक्षातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles