स्वयंघोषित कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात () याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता 1 एप्रिलपर्यंत खरात पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे.
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे यांच्यावर धक्कादायक आरोप केले.उपसभापती नीलम गोऱ्हे ) गेले पाच ते सहा वर्षे अशोक खरात (Ashok Kharat) याच्याकडे जात होत्या. त्यांना विधान परिषदेवर आमदारकी हवी होती. इतर वेळेस नीलम गोऱ्हे अनेक गोष्टींवर बोलतात. आता अशोक खरातवर का बोलत नाहीत?
अशोक खरात पाथर्डी येथील पैसा हॉटेलमध्ये भेटायला देखील आला होता. तो तिथं तुम्हाला भेटण्यास का आला होता. तुमच्यात आणि त्यांच्यात काही आर्थिक व्यवहार आहेत का? का आणखीन काही हे सगळ्या गोष्टी समोर यायला हवेत, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
नाशिकमधील एक्सप्रेस-इन हॉटेलमध्येही नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात यांची भेट झाली. आमदारकी आणि मंत्रिपदसाठी अनेकवेळा भेटल्या होत्या, असा धक्कादायक आरोपही तृप्ती देसाईंनी केला.
गोऱ्हे गेले सात ते आठ वर्षांपासून अशोक खरातला ओळखत होत्या. नीलम गोऱ्हे यांचा अशोक खरात यांच्याशी काही आर्थिक देवाणघेवाण आहे का? याच्याबाबत एसआयटीने चौकशी करायला हवी, असं तृप्ती देसाईंनी सांगितले.नीलम गोऱ्हे यांनी या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं. रूपाली चाकणकरांवर ज्या पद्धतीने कारवाई झाली त्याच पद्धतीने नीलम गोऱ्हे यांच्यावर देखील कारवाई व्हायला हवी, अशी मागणी तृप्ती देसाईंनी यावेळी केली.


