अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ; भोंदूबाबा खरातचा एन्काऊंटर होणार

भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्यांनी महाराष्ट्रासह देश हादरून गेला आहे. अशोक खरातचे करारनामे समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी अटक केलेल्या भोंदूबाबा अशोक खरातची लोकांना फसवून कोट्यवधींची माया कमावली. खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागले. अनेक राजकीय नेत्यांचे खरातसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणात भोंदूबाबा अशोक खरातचा एन्काऊंटर होणार असल्याचा दावा महिला नेत्याने केला आहे.

राज्यातील बड्या नेत्यांनी अशोक खरातची भेट घेतल्याचे समोर आलं आहे. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशोक खरातने शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे समोर आलं आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाचे शेकडो व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. नाशिकच्या भोंदूबाबाचा कारनामा त्याच्या ऑफिसबॉयने उजेडात आणला. त्यानंतर पोलिसांनी अशोक खरातवर कारवाईचा दणका दिला.

अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांनी राज्य आयोगाच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्याआधी रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे रुपाली चाकणकरांनी राजीनामा सोपवला. आता चाकणकर यांना सहआरोपी करून अटकेची मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

अशोक खरात प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षांचा तीनच दिवसात राजीनामा झाला. परंतु आता सुनेत्रा पवारांनी रूपाली चाकणकरांची पक्षातून हकालपट्टी करणे गरजेचे आहे. अशोक खरातला आता संपवण्याचा डाव होऊ शकतो. कारण अनेक मंत्री राजकारणी यांचे संबंध त्याच्याशी आहेत. ते उघड होऊ नये, यासाठी त्याचा एन्काऊंटर 24 तारखेला होऊ शकतो, अशी शंका काही पीडित व्यक्तींना आहे. त्याच्या एन्काऊंटर डाव मुख्यमंत्र्यांनी उधळून लावावा’.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles