एथर इलेक्ट्रिक स्कूटर आता फक्त 40 मिनिटांत फुल चार्ज
अहिल्यानगरमध्ये 6 किलोवॅटचा फास्ट चार्जर सुरू
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्यांसाठी एथर इलेक्ट्रिक स्कूटर आता केवळ 40 मिनिटांत चार्ज होणार आहे. कायनेटिक चौक व सावेडी येथील एथर इलेक्ट्रिक स्कूटर शोरूममध्ये नागरिकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक 6 किलोवॅट क्षमतेचा फास्ट चार्जर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यापूर्वी एथर स्कूटरसाठी 3 किलोवॅट क्षमतेचे चार्जर उपलब्ध होते. त्यामुळे स्कूटर पूर्ण चार्ज होण्यासाठी अधिक वेळ लागत होता. मात्र आता कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत 6 किलोवॅटचा फास्ट चार्जर उपलब्ध केल्याने चार्जिंगचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
एथर शोरूमचे संचालक रितेश नय्यर यांनी सांगितले की, नवीन फास्ट चार्जरमुळे ग्राहकांना वेळेची मोठी बचत होणार आहे. अवघ्या 40 मिनिटांत स्कूटर चार्ज होत असल्याने नागरिक निर्धास्तपणे शहरात तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर करू शकतील. व एथरचा 6 किलोवॅट क्षमतेचा फास्ट चार्जर अहिल्यानगरमध्ये सुरू
फक्त 40 मिनिटांत इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज होणार व पूर्वीच्या 3 किलोवॅट चार्जरपेक्षा दुप्पट वेगवान चार्जिंग
पर्यावरणपूरक आणि इंधन खर्चात बचत करणारा पर्याय
भविष्यात शहरातील विविध ठिकाणी फास्ट चार्जिंग सुविधा उपलब्ध होणार
इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढणारा कल आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची गरज लक्षात घेता, एथर कंपनीचा हा उपक्रम नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
अहिल्यानगरमध्ये एथर इलेक्ट्रिक स्कूटर आता केवळ 40 मिनिटांत चार्ज होणार
- Advertisement -


