मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेत ओबीसीतून आरक्षणाचा मार्ग मोकळा केल्यानंतर राज्य सरकार समोर आता आणखी एक नवे संकट आले आहे. हैदराबाद गॅझेट मधील नोंदीचा आधार घेत बंजारा समाजालाही आदिवासींना मिळणारे एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करा, या मागणीसाठी सोलापुरात बंजारा समाजाचा भव्य मोर्चा निघाला. दरम्यान अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांनी आदिवासींमध्ये घुसखोरी होऊ देणार नाही, अन्यथा आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल असा थेट इशारा दिला आहे.
हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाची नोंद आदिवासी म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे आदिवासींना मिळणारे एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करा या मागणीसाठी समाजाचे मराठवाड्यात आंदोलन सुरू आहे. आज बीडमध्ये या मागणीसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला. मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला तेव्हापासूनच राज्यात ओबीसी आणि त्यानंतर बंजारा, महादेव कोळी व इतर समाजाने आदिवासी आरक्षणासाठी आक्रमक पावित्र घेतला होता.
याबाबत अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटेंनी आदिवासींमध्ये घुसखोरी होऊ देणार नाही, अन्यथा आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल असा थेट इशारा दिला आहे. लहामटे म्हणाले,” राजकीय नेत्यांनी समाजाची दिशाभूल करणे थांबवावे. महाराष्ट्रात बंजारा काय कुठलाच समाज आदिवासींमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. ” असे म्हणाले.
आमदार लहामटे पुढे म्हणाले, ” धनगर आणि बंजारा समाजाला पूर्वीच आरक्षण भेटलेले आहे. विनाकारण राज्यात वातावरण तापवण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल. वेळ आली तर कोर्टात जाऊ. आदिवासी समाजाचे आजी माजी आमदार समाजसोबत आहेत. तसेच आम्ही आहोत तोपर्यंत आदिवासी समाजात घुसखोरी होऊ देणार नाही. ”
दरम्यान बीड येथे बंजारा मोर्चादरम्यान झालेल्या सभेत धनंजय मुंडे यांनी बंजारा समाज आणि वंजारी एकच या वक्तव्यावर मोठे वादक निर्माण झाला असून यावर आता बंजारा समाजातून प्रतिक्रिया सुरुवात झाली आहे.या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात नवं वादळ निर्माण होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


