बारामती पोटनिवडणूक ;सुनेत्रा पवारांसाठी रोहित पवारांचे बारामतीकरांना भावनिक आवाहन!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होत होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने आपण ही निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार जाहीर केला आहे. यादरम्यान रोहित पवार यांनी एक सोशल मीडिया पोस्ट करत भावनिक आवाहन केले आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी निवडणूक बिनविरोध झाली नाही तर सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असे आवाहन रोहित पवार यांनी बारामतीकरांना केले आहे.
रोहित पवारानी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत बारामतीकरांना आवाहन केले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य करतील असा विश्वास आहे, परंतु तसं झालं नाही तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत, असं समजून बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असं आवाहन करतो!” असे रोहित पवार म्हणाले आहेत. तुमचं एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, असेही रोहित पवारांनी म्हटले आहे.

 

https://x.com/RRPSpeaks/status/2040989998871396784?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2040989998871396784%7Ctwgr%5E36a2a591ec00846b3de9afe7885b894aafbb1364%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fbaramati-assembly-bypoll-rohit-pawar-emotional-appeal-sunetra-pawar-victory-updates-rak-94-5817056%2F

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles