Monday, February 23, 2026

विमान दुर्घटनेपूर्वी कॅप्टन शांभवी पाठक यांनी आजीला पाठवला होता ‘हा’ शेवटचा संदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात निधन झालं. अजित पवार हे एका खासगी विमानाने मुंबईवरून बारामतीला जात असताना विमानाच्या लँडिंग दरम्यान विमानाचा अपघात झाला आणि यामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला .

अपघातात वैमानिक कॅप्टन सुमीत कपूर आणि सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांचाही मृत्यू झाला. बारामतीला जाण्यापूर्वी सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांनी त्यांच्या आजीला एक मेसेज केला होता. ‘Hi Dadda Good Morning…’, असा मेसेज शांभवी यांनी त्यांच्या आजीला केला होता. त्यांच्या या मेसेजला आजीने ‘Good Morning Cgeeni’, असं म्हणत रिप्लाय देखील दिला होता.

शांभवी पाठक यांचा हाच मेसेज शेवटचा ठरेल याची आपण कल्पनाही केली नव्हती, असं म्हणत त्यांच्या आजीने दु:ख व्यक्त केलं आहे. शांभवी पाठक या मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या रहिवासी होत्या, त्यांना त्यांचे कुटुंबीय प्रेमाने ‘चिनी’ म्हणत असत असं शांभवी पाठक यांच्या आजीने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या शांभवी पाठक या फर्स्ट ऑफिसर होत्या. सहवैमानिक म्हणून त्या सुमीत कपूर यांना सहकार्य करत होत्या. फ्लाईट इनस्ट्रक्शन, ट्राफिक कंट्रोलशी संवाद साधणे आणि विमान उड्डाणादरम्यानचे निर्णय घेण्याचे काम पाठक करत होत्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles