Thursday, February 19, 2026

जीएसटी अधिकारी मृत्यू प्रकरणाला नवं वळण…सहाय्यक आयुक्तांवर अखेर गुन्हा

बीड येथील जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता सहा दिवसांनंतर नवं वळण मिळालं आहे. वरिष्ठ अधिकारी आणि जीएसटीचे सहायक आयुक्त प्रदीप फाटे यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 जानेवारी रोजी सचिन जाधवर यांनी टोकाचे पाऊल उचलले होते, मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास विलंब केल्याने जाधवर कुटुंबियांनी संताप व्यक्त केला होता.

सचिन जाधवर यांनी कपीलधार परिसरात आपली जीवनयात्रा संपवली होती. त्यांच्या कारमध्ये पोलिसांना मडक्याचे तुकडे आणि एक सुसाईड नोट सापडली होती. या चिठ्ठीत त्यांनी आपले वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे हे मानसिक छळ करत असल्याचं स्पष्टपणे नमूद केले होते. अवेळी कॉल करणे आणि कामाचा नाहक त्रास देणे या कारणांमुळे आपण आत्महत्या करत असल्याचे जाधवर यांनी त्यात लिहिले होते.

सुसाईड नोट असूनही सहा दिवस पोलीस कारवाई करत नसल्याने जाधवर यांचे आई, भाऊ आणि पत्नी आक्रमक झाले. त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली आणि सायंकाळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. नातेवाईकांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आणि वाढता दबाव पाहून पोलिसांनी प्रदीप फाटे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles