भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अहिल्यानगर शहराची कार्यकारिणी जाहीर शहर सरचिटणीस पदी अजित सुभाष कोतकर यांची निवड
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व प्रदेश अध्यक्ष मा आ रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आदेशाने,
भाजपाचे वरिष्ठ नेते व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, मा. कार्यसम्राट खासदार सुजयदादा विखे पाटील, तसेच जिल्हाध्यक्ष अनिल (आण्णा) मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार भाजपा युवा मोर्चा अहिल्यानगर शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
ही कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष ॲड ऋद्रेश भाऊसाहेब अंबाडे यांच्या नेतृत्वाखाली घोषित करण्यात आली .या कार्यकारिणीत शहर सर चिटणीस पदी अजित सुभाष कोतकर यांची निवड करण्यात आली याबद्दल माजी खासदार सुजयदादा विखे, जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते साहेब, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, प्रा. भानुदास बेरड सर, नगरसेवक मनोज कोतकर,युवा नेते राजेंद्र सातपुते यांनी अभिनंदन केले


