Friday, February 20, 2026

भिगवणमधील अपहरण झालेली तरुणी मध्यरात्री पोलीस ठाण्यामध्ये हजर ; नेमकं काय घडलेलं, सगळं सांगितलं!

इंदापूर तालुक्यातील भिगवनमध्ये आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना 21 वर्षीय तरुणीचे भरदिवसा अपहरण झाल्याची घटना मंगळवारी (दि. 17) दुपारी चारच्या सुमारास घडली. तरुणीच्या आईला व भावाला मारहाण करीत डोळ्यांत मिरचीपूड टाकून दोन सख्ख्या भावांनी तरुणीला जबरदस्तीने टेम्पोमध्ये नेल्याची फिर्याद तरूणीच्या घरातील व्यक्तींनी पोलिसांना दिली होती. मात्र संबंधित तरुणीने व्हिडीओ शेअर करत जबरदस्ती नाही तर माझ्या इच्छेने मी निघून गेले असल्याचे स्पष्ट केले. मात्र संबंधित तरुणी नेमकी कुठे आहे, तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे सहा पथक रवाना झाले होते. परंतु तरुणीचा शोध कुठेही लागला नव्हता. त्यानंतर काल मध्यरात्री भिगवन प्रकरणातील अपहरण झालेली मुलगी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली.

इंदापूर तालुक्यातील भिगवन प्रकरणातील अपहरण झालेली मुलगी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली आहे. मुलगी स्वतःच्या इच्छेने निघून गेली असल्याचा जबाब मुलीने पोलिसांना दिला आहे. तसेच नेमकं काय घडलेलं, याबाबतही तरुणीने माहिती दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जहीर हरून शेख व आयान हरून शेख (रा. शेखवस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपहरण झालेली तरुणी आणि तरुणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये तिने म्हटलंय की, जबरदस्ती नाही तर माझ्या इच्छेने मी निघून गेले असल्याचे तरुणीने सांगितले आहे. आमचे एकमेकांवर प्रेम असल्याचा खुलासा या तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. मी जहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षांपासून प्रेमसंबंधात आहे. कालच्या प्रकरणात माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केली नाहीये. मी माझ्या इच्छेने आली असल्याचे तरुणी या व्हिडिओमध्ये सांगताना दिसते आहे.

– 17 फेब्रुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास लग्नाची खरेदी करून जात असताना भावाच्या आईच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचा अपहरण करण्यात आलं.
– रात्री मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमला होता.
– पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी भिगवन बंदची हाक देण्यात आली.
– रात्री पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिल्यानंतर पुणे सोलापूर हायवे रोखून धरण्यात आला.
– अपहरण झालेल्या मुलीचे आणि मुलाचे घर शेजा शेजारी आहे.
– दोघांच्यात एक महिनाभरापासून फोनवर बोलणं होत होतं असे कॉल डिटेल्स पोलिसांनी काढलेत.
– व्हॉट्सअॅप माध्यमातून काय बोलणं झालं हे पोलीस काढत आहेत.
– मुलीचे वय 21 वर्ष आहे.
– अद्यापही मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं नाही.
– अपहरण झालेल्या मुलीचे 22 तारखेला लग्न आहे.
– आई, भाऊ आणि ती लग्नाच्या खरेदीवरून घरी जात असताना अपहरण करण्यात आलं आहे.
– आरोपी आणि अपहरण झालेली मुलगी एकमेकांना लहानपणापासून ओळखतात.
– शोधासाठी पोलिसांनी सहा पथके रवाना केली आहेत.
– पोलिसांनी 165 किलोमीटरचा रूट मॅप केला आहे.
– यामध्ये कोणताही धार्मिक ते निर्माण होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी.
– कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नयेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
– जर कुणी अशा पद्धतीचे वर्तन केलं तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
– पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे.
-अपहरण झालेली तरुणी 20 फेब्रुवारीला मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली.
-मुलगी स्वतःच्या इच्छेने निघून गेली असल्याचा जबाब तरुणीने पोलिसांना दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles