भोंदूबाबा अशोक खरातची पत्नी फरार, मुलगा पोलिसांच्या ताब्यात

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार आहे. त्याच्याविरोधात नवनवीन तक्रारी दाखल होत आहेत. अशोक खरातने केलेलं लैंगिक शोषण, अनेकांना घातलेला आर्थिक गंडा आणि इतर अनेक कारनाम्यांची जंत्री वाढतच चालली आहे. त्यामुळे खरातची कोठडी एसआयटी कोर्टाकडे वाढवून मागणार आहेत.

अशोक खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशोक खरातवर दाखल असणाऱ्या अत्याचाराच्या पहिल्या गुन्ह्यात याधी तीनवेळा त्याला पोलीस कोठडी सूनवण्यात आली आहे. अशोक खरातला आज कोर्टात हजर करण्याआधी रात्री उशिरापर्यंत नाट्यमय घडामोडी घडत होत्या. शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसह त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एसआयटीचे पथक खरातच्या घरी जाण्याअधीच खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाली. तर खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतलेअशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्यानं त्याच्या समोर मुलाची चौकशी होणार आहे.

अशोक खरात सहकार्य करत नाही, स्पष्ट माहिती देत नसल्यानं तपास पुढे सरकत नसल्याची माहिती समोर येत आहे. अशोक खरातकडून अधिकाधिक माहिती गोळा करून त्याच्या पत्नीला अटक करण्याचं एसआयटीचे लक्ष आहे. सुरुवातीला लैंगिक शोषणाचा गुन्ह्याचा तपास करण्यावर एसआयटीचा भर असून त्यानंतर इतर गुन्ह्याचा तपास केला जाणार आहे. आज अशोक खरातला कोर्टात हजर केल्यानंतर सरकारी पक्ष काय बाजू मांडतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार असताना एसआयटीकडून अशोक खरातचा सीए, ईशान्यश्वर मंदिराचा पुजारी आणि एक सराफ व्यवसायिकाची कसून चौकशी करण्यात आली. अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार असून काल एसआयटीने खराच प्रकरणे सबळ पुरावे गोळा करण्यासाठी तिला दोन मोठ्या कारवाया केल्या. व्यापाराची फसवणूक प्रकरणी अशोक कराडची चौकशी तर, ईशान्यश्वर मंदिरात कोणते कारणामे सुरू होते. याची चौकशी आणि आर्थिक व्यवहार सांभाळणारा सीए याची देखील एसआयटीकडून चौकशी करण्यात आली. अशोक खरातला आज कोर्टात दाखल केल्यानंतर एसआयटीकडून महत्त्वाचे पुरावे कोर्टासमोर सादर करत पुन्हा पोलीस कोठडी मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles