लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, ६१ हजार बहिणी अपात्र

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. यामधून लाखो महिलांना आता बाद करण्यात आले आहे. त्यानंतर आता नागपूर (Nagpur) जिल्ह्यात ६१,१४६ लाडक्या बहिणी अपात्र असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही आहेत.

आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही घेतला लाभ

घरची आर्थिक स्थिती चांगली असताना देखील घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेची अट अशी होती की, ज्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहेत. त्यांनाच योजनेचा लाभ घेता येतो. परंतु या महिलांची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे काही पुरुषांचा देखील यामध्ये समावेश आहे.

अपात्र लाभार्थ्यांना प्रशासनाने योजनेतून हद्दपार केले आहे. त्यामुळे त्यांना आता इथून पुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये.नागपूर जिल्ह्यात एकूण पाच लाख ८० हजार ४१३ जणांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते.अर्ज दाखल केल्यानंतर सुरुवातीचे हप्तेही त्यांच्या खात्यात जमा झाले.मात्र छाननी नंतर यातील ६१,१४६ अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे आता ६१,१४६ महिलांना इथून पुढे १५०० रुपये मिळणार नाहीत.

लाडकी बहीण योजनेतून ५० लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. यातील काही महिला इतर योजनांचा लाभ घेत आहेत. तर अनेक महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे. अनेक महिलांकडे चारचाकी वाहन आहे. जवळपास अडीच हजार सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles