अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी बिहारच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. बिहारच्या निवडणुका या दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान हे 6 नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणूक ही 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी 10 ऑक्टोबर आणि 13 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
बिहार निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 17 ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि 20 ऑक्टोबर (दुसरा टप्पा) असेल.
अर्जांची छाननी ही 18 ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि 21 ऑक्टोबर (दुसरा टप्पा) रोजी होणार.
अर्ज मागे घेण्याची मुदत ही 20 ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि 23 ऑक्टोबर (दुसरा टप्पा) असेल.
मतदान –
पहिला टप्पा – 6 नोव्हेबर
दुसरा टप्पा – 11 नोव्हेंबर
बिहारमध्ये आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. त्याचसोबत सर्व निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि इतर सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, “यावेळी बिहारच्या निवडणुका सुरळीत आणि सोप्या पद्धतीने होतील. निवडणुकीसाठी आम्ही बिहारच्या जनतेचे सहकार्य अपेक्षित करतो. बिहारमध्ये एकूण 7 कोटी 42 लाख मतदार आहेत. त्यापैकी 3 कोटी 92 लाख पुरुष आणि 3 कोटी 50 लाख महिला मतदार आहेत. 14 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करतील. प्रत्येक मतदान केंद्रावर 1,200 मतदार असतील.”


