भाजपने राज्यसभेसाठी ४ उमेदवारांची यादी जाहीर केली
रामदास आठवले यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली
अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट करत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजेच सात जागा रिक्त होणार आहेत. त्यानुसार आता भाजपाकडून महाराष्ट्रातील जागांसाठी आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांचे नाव राज्यसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आले आहे. २०१९ नंतर संसदीय राजकारणापासून दूर गेलेल्या विनोद तावडेंचे यानिमित्ताने पुनरागमन होत आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून ४ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना भाजपने राज्यसभेसाठी संधी दिली आहे. रामदास आठवले यांना भाजपने राज्यसभेसाठी पुन्हा संधी दिली आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या पत्ता कट करत भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक
५ मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
६ मार्च – अर्जांची छाननी
९ मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
१६ मार्च – सकाळी ९ ते सायं. ४ मतदान; सायं. ५ नंतर मतमोजणी


