बिहार निवडणुकीआधी भाजपला मोठा झटका बसला आहे. प्रसिद्ध युट्युबर आणि भाजप नेते मनीष कश्यप यांनी पक्षाची साथ सोडली आहे. मनीष कश्यप यांनी फेसबुक लाईव्ह करत राजीनाम्याची घोषणा केली आहे. कश्यप यांनी २५ एप्रिल २०२४ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ‘मी गावातील लोकांशी चर्चा करून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असं मनीष कश्यप यांनी पक्ष सोडताना म्हटलं आहे.
मनीष कश्यप यांनी पुढे म्हटलं की, ‘मी पक्षात राहून लोकांचा आवाज उचलू शकत नाही. त्यानंतर मी निर्णय घेतला आहे. मला हा निर्णय घेण्यास भाग पाडलं आहे. काही नेत्यांनी माझ्यावर महत्वकांक्षी होण्याचा आरोप केला आहे’.
‘मला प्लॅटफॉर्मची आवश्यकता आहे. आता लोकांनी सांगावं की, आता मी स्वत:चा पक्ष स्थापन करावा का? परंतु मी त्या स्थितीत नाही. मी काय करावं? कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली पाहिजे? एकट्याने की स्वतंत्र्य लढलं पाहिजे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
यूट्यूबर मनीष यांनी नाव घेता भाजप नेत्यांवरही निशाणा साधला. कश्यप यांनी म्हटलं की, ‘तुम्ही भ्रष्टाचार पाहूनही डोळे बंद करून बसला आहात. बिहारच्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी उभा आहे. माझा लढा आरोग्य व्यवस्था सुधरवण्यासाठी आहे. काही दिवसांपूर्वी मनीष यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती.
मनीष यांना झालेल्या मारहाणीची दखल भाजप नेत्यांकडून घेण्यात आली नव्हती. यावरून नाराज होऊन मनीष यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मनीष कश्यप यांनी २८ मार्च लाईव्ह यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. मनीष यांनी गुरुवारी रात्री म्हटलं की, पोलिसांनी युट्युब चॅनलच्या विरोधात एफआयआर नोंद केली आहे.


