Saturday, November 1, 2025

भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी

भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. नवनीत राणा यांना याआधीही पाकिस्तानातून जिवे मारण्याची धमकी आली होती. आता एका इस्टाग्रामवरील रीलच्या माध्यमातून त्यांना धमकी देण्यात आलीय.सोशल मीडियावर रिल्स तयार करून नवनीत राणा यांना गळा कापण्याची आणि जिवे मारण्याची धमकी एका व्यक्तीने दिलीय. याप्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय. नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांच्याकडून ही तक्रार दाखल करण्यात आलीय. राजापेठ पोलिसांनी इंस्टाग्राम अकाउंट धारकावर गुन्हा दाखल केलाय. दरम्यान रील बनणाऱ्यानं इंस्टाग्रामवरील धमकी देणारी पोस्ट डिलीट केलीय. दरम्यान राजापेठ पोलीस सायबर पोलिसांच्या माध्यमातून करणार तपास करणार आहे. यापूर्वीही अनेकवेळा नवनीत राणा यांना जिवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. मागे एकदा त्यांना पाकिस्तानातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या संदेशात ‘हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढने वाली थोडे दिन की मेहमान है. जल्दी उडने वाली है.’ असं म्हटलं होतं. पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर राणा यांच्याकडून ही माहिती पोलिसांना दिली होती. आता पुन्हा एकदा नवनीत राणा यांना धमकी आलीय.

२०२४ मध्येही नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकी आली होती. त्यांच्या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर क्लिप पाठवून त्याना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ही धमकी आली होती. आता पुन्हा राणा यांना धमकी आल्यामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागलीय.नवनीत राणा यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे झालेल्या नुकसानबाबत डिवचले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानमधून धमकी आली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles