अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर भाजप पकड मजबूत करत असल्याचा सूर असताना, भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी, अजितदादांची राष्ट्रवादी, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे सक्षमपणे पुढे नेऊ शकतात, असं विधान केलं आहे. या मुळे राज्याच्या राजकारणात भाजपच्या ‘गेमप्लॅन’विषयी चर्चांनी जोर पकडला आहे.
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मतदान सुरू आहे. मतदानाचा आढावा घेतल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरणात, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कोंडी होत आहे का? यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी पटेल अन् तटकरे यांची बाजू घेतली.
प्रवीण दरेकर म्हणाले, “पार्थ पवार अन् शरद पवार यांची भेटी होत आहेत. यात काहीच गैर नाही. ते कुटुंब आहे. कुटुंब दुःखात आहे. या काळात कुटुंबातील ज्येष्ठांची भेट घेणं, आणि ते राजकारणाशी जोडणं, हे योग्य नाही आणि त्याची आवश्यकता नाही. कोणाचीही अडचण होत नाही.” प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे, हे त्यांचा पक्ष पुढे नेण्यास सक्षम आहेत, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.


