*अहिल्यानगरमध्ये सकल मराठा परिवारतर्फे महारक्तदान उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन*
राज्यात निर्माण झालेल्या रक्तटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या आवाहनानुसार सकल मराठा परिवार तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात महारक्तदान उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून अहिल्यानगर येथे न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात एकूण *३० रक्तदात्यांनी रक्तदान* करून समाजहिताचा उत्कृष्ट आदर्श ठेवला. काही इच्छुक दात्यांना वैद्यकीय कारणास्तव रक्तदान करता आले नसले, तरी त्यांची उपस्थिती व उत्साह कौतुकास्पद असल्याचे सकल मराठा परिवारातर्फे सांगण्यात आले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी *सकल मराठा परिवार, अहिल्यानगर टीममधील *अहिल्यानगर जिल्हा समन्वयक सचिन रेडे,संकेत नरसाळे, तुकाराम कदम, राजेंद्र चौधरी, हनुमंत बोलबट, प्रशांत काळे,अजय थोरात,अनिकेत आवारे,अनंत चव्हाण व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य *डॉ. बाळासाहेब सागडे, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी **प्रा. गणेश निमसे, **प्रा. भगवान कुंभार* व एन.एस.एस. स्वयंसेवक यांचा सक्रिय सहभाग लाभला.
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी केलेला सहभाग आणि आयोजन समितीचे प्रयत्न यामुळे महारक्तदान उपक्रमाला मोलाची चालना मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.


