Wednesday, March 4, 2026

शिवसेना व मनसेत बिनसलं? राज ठाकरे घेणार मोठा निर्णय

मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना प्रमुख आणि मनसेनं युती करून भाजप महायुतीला बहुमत टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र या निवडणुकीत भाजपने बाजी मारत स्वतःचा महापौर बसवला. यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महानगर पालिकेत 3 स्वीकृत नगरसेवक झाले या पैकी एक नगरसेवक मनसेचा व्हावा, अशी मनसेची अपेक्षा होती. स्वीकृत नगरसेवक पद न दिल्यामुळे काही प्रभाग समितीचे अध्यक्ष पद ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला देण्यात येणार होते, अशी चर्चा दोन पक्षाच्या नेत्यांमध्ये झाली. मात्र आता प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहण्याची भूमिका मनसे घेत असल्याची माहिती आहे. मनसेच्या या भूमिकेमुळे फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो तर फायदा महायुतीला होऊ शकतो.

मुंबई महापालिकेतील 17 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडेल. पुढील तीन दिवसांत या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार आहेत. महापौर-उपमहापौर निवडीनंतर ही पहिली मोठी राजकीय चाचणी मानली जात असल्याने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles