सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अजिबात नेम नाही. सध्या सोशल मीडियावर लग्नामधील व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नेटकऱ्यांना देखील लग्नामधील व्हिडीओ बघायला प्रचंड आवडते. लग्नामधील व्हिडीओमध्ये नवरदेव आणि नवरीच्या व्हिडिओंना खूप पसंती दिली जाते. सध्या अशाच प्रकारचा लग्नातील नवरदेव आणि नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सर्वांना आवडत असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धूमाकुळ घालताना दिसतो आहे.
लग्नानंतर जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात नवऱ्यानं नवरीला उचलून घेत डान्स केला आहे. लग्नानंतर जागरण गोंधळ हा महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक व सांस्कृतिक कुलाचार आहे, जो खंडोबा, भवानी माता किंवा कुलदेवतेच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवन सुखी व्हावे आणि लग्नकार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी केला जातो। यात कुलदेवतेची गाणी (गोंधळ), नृत्य आणि तळी भरून देवाला साकडे घातले जाते.यात ‘गोंधळी’ लोक पारंपारिक वेशभूषेत, दिवा (दिवट्या) हातात घेऊन देवीची/खंडोबाची गाणी गातात आणि तळी भंडार (भंडारा-खोबरे) अर्पण करतात.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा नवरीचा लग्नानंतरचा गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमात नवरी खांद्यावर पदर घेत नाचताना दिसत आहे. यावेळी नवरदेवही नवरीसोबत नाचताना दिसत आहे. “तुझ्या हाताला धरुन लगीन करुन…जेजुरी नेईन गं”च्या तालावर नवरीनं ठेका धरत पारंपारिक डान्स केला आहे. यावेळी नवरीनं संस्कृती जपत डान्स केल्यानं तिचं आता सर्वत्र कौतुक होतंय.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर renuka_aatya_chwan_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.


