Video : लग्नात पैशांचा पाऊस, वराने वधूवर उधळले ८ कोटी? व्हिडीओ व्हायरल होताच नवरदेवाच्या कुटुंबाचा मोठा खुलासा

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओमध्ये कधी अपघाताचे किंवा कधी भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होतात, तर कधी लग्नसोहळ्यातील एखाद्या घटनेचे किंवा डान्सचे व्हिडीओ व्हायरल होतात. जे इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घालतात. आता अशाच प्रकारे एका लग्नसोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर या लग्नाची मोठी चर्चा रंगली आहे.

पंजाबमधील एका लग्नसोहळ्यात वराने वधूवर तब्बल ८.५ कोटी रुपयांचा वर्षाव केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. वराने ८.५ कोटी रुपयांचा वर्षाव केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात असून व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवरदेवाच्या कुटुंबाने खुलासा करत ८.५ कोटी रुपये उधळल्याचा दावा फेटाळून लावला आहे.पंजाबमधील तरनतारन शहरातील एका लग्नसोहळ्यामधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वराकडून वधूवर नोटांचा वर्षाव करण्यात येत असल्याचं दिसत आहे. यावेळी त्या ठिकाणी असलेले पाहुणे मंडळी संगीतावर डान्स करताना दिसत आहेत. तसेच नोटांचा वर्षाव केल्यामुळे खाली फरशी पैशांनी भरलेली दिसत आहे, तरीही काही जण आणखी नोटा हवेत उधळताना दिसत आहेत.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वराने वधूवर लग्नात तब्बल ८.५ कोटी रुपये उधळल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यावर वराच्या कुटुंबाने खुलासा केला. नवरदेवाचा भाऊ सिकंदर सिंग यांनी म्हटलं की, “लग्नसोहळ्यात पैशांचा वर्षाव करण्यात आला असला तरी ही रक्कम सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्या एवढी नाही. माझा भाऊ ऑस्ट्रेलियामध्ये ट्रक व्यवसाय करतो. १४ फेब्रुवारी रोजी लग्न झालं असून आम्ही लग्न पैशांचा वर्षाव करून साजरा केलं. पण ते फक्त २ लाख रुपये होते. मात्र, सोशल मीडियावर कोटींमध्ये आकडे सांगितले जात आहेत ते चुकीचे आहेत.”


दरम्यान, कार्यक्रम व्यवस्थापक आणि कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणारे डीजे यांनीही व्हायरल झालेला ८.५ कोटी रुपयांचा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी म्हटलं की, ‘ही रक्कम ४ लाख रुपयांच्या आसपास होती. त्यामध्ये काही डॉलर आणि नोटांचा समावेश होता. पण सोशल मीडियावर थेट कोटींचा आकडा कसा समोर आला? याबाबत आम्हाला काहीही कल्पना नाही.’

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles