Thursday, March 5, 2026

अहिल्यानगर मध्ये सात हजाराची लाच घेताना सेतू चालक एसिबिच्या जाळ्यात

अहिल्यानगर- आईच्या नावे असलेल्या जमीनीचे फेरफार रद्द करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तक्रारदार व त्याच्या भावाकडे मंडळ अधिकारी यांच्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागणी करून त्यातील ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सेतू चालक गणेश कचरू घोरपडे (सेतु व्यवसाय गणेश मल्टी सर्विसेस)भैरवाडी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ४ मार्च रोजी रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई नेवासा येथे करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की दि. १६/०२/२०२६ तक्रारदार व त्यांचा भाऊ हे त्यांच्या आईच्या नावे असलेली मौजे नेवासा बु|| तालुका नेवासा येथील हे ८० आर क्षेत्रफळ फेरफार रद्द करण्याच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर भाग, अहिल्यानगर आरटीएस २१०/२०२५ प्रमाणे दिलेले फेरफार रद्द करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी या करिता मंडळ अधिकारी नेवासा खुर्द यांना समक्ष भेटले.त्यावेळी मंडळाधिकारी कार्यालयाबाहेर खाजगी इसम गणेश घोरपडे हे भेटले व तक्रारदार यांना म्हणाले की मी तुमचे काम मंडळाधिकारी श्री बाबासाहेब माने यांच्याकडून करून देतो, मला व बाबासाहेब माने मंडळाधिकारी यांना, १२,००० रुपये द्या, असे म्हणाले असता तक्रारदार यांच्या भावाने खाजगी इसम घोरपडे यांना फोन पे वर ५००० रुपये दिले. त्यानंतर दिनांक ०१/०३/२०२६ रोजी खाजगी इसम घोरपडे यांनी तक्रक्ररदार यांची भेट घेऊन सांगितले की मी बाबासाहेब माने मंडळाधिकारी यांच्याकडून तुमचे काम करून दिले त्यामुळे उर्वरित ७००० रुपये मला देऊन टाका असे म्हणून खाजगी इसम गणेश घोरपडे हा तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करत असले बाबत तक्रार होती.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि.०४/०३/२०२६ रोजी १२:३९ ते १२:५१ वाजेच्या दरम्यान गणेश मल्टीसर्व्हिसेस, नेवासा खुर्द, ता. नेवासा येथे लाचमागणी पडताळणी वेळी यातील खाजगी इसम गणेश घोरपडे यांनी तक्रारदार यांच्याकडे बाबासाहेब माने, मंडळाअधिकारी नेवासा बुद्रूक यांच्याकरीता ७,००० रू. लाचेची पंचासमक्ष मागणी केली व यशस्वी सापळा कारवाई १४:२९ वा ते १४:५१ वा. च्या दरम्यान मागणी केलेली सदरची ७००० रू. लाचरक्कम गणेश मल्टीसव्हिसेस, नेवासा खुर्द, ता. नेवासा येथे गणेश घोरपडे खाजगी इसम यांनी स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यासंदर्भात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७अ, प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles