नगर शहरालगत असलेल्या केडगाव परिसरात ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. पुण्याच्या दिशेकडून अहिल्यानगर कडे येत असताना केडगाव अंबिका बस स्टॉपजवळ शिवाई बस कंटेनरला ओव्हरटेक करत असताना ही धडक झाली, ज्यात सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मध्यरात्री १२ वाजता केडगाव येथील अंबिका बस स्टॉपजवळ हा अपघात झाला. शिवाईबस भरधाव वेगाने कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना हा भीषण अपघात झाला आहे. धडक इतकी जोरदार होती की बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात बसमधील सात ते आठ प्रवासी जखमी झाले. यापैकी दोन जणांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. सर्व जखमींना स्थानिकांच्या मदतीने तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर केडगाव परिसरात रस्त्यावर मोठ्या वाहनांची गर्दी झाली. महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. स्थानिक रहिवाशांनी तात्काळ मदत करत जखमींना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेला पाचारण केले.
केडगावमध्ये मध्यरात्री बस-कंटेनरचा भिषण अपघात, ७ ते ८ प्रवासी गंभीर जखमी !
- Advertisement -


