ज्यादा परताव्याच्या आमिषाने व्यवसायिकाची 80 लाखांची फसवणूक; पती-पत्नीसह चौघांविरुद्ध नगरमध्ये गुन्हा दाखल

15 टक्के कमिशनचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 80 लाखांची फसवणूक
अहिल्यानगर -विमान तिकीट व हॉटेल बुकिंग व्यवसायात गुंतवणूक करून 15 टक्के कमिशनचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची 80 लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश ब्रिजलाल बन्सल (वय 55, रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये राहुल दर्शन जगताप, एंजल राहुल जगताप, सुशिला दर्शन जगताप (रा. सानपाडा, नवी मुंबई) व इब्राहीम सॅम्युअल (रा. भोपाळ) यांनी रिजॉईस इव्हेंट ऑर्गनायझेशनफ या कंपनीत गुंतवणूक केल्यास महिन्याभरात चांगला परतावा व 15 टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार बन्सल यांनी 4.70 कोटी रुपये त्यांच्या खात्यात वर्ग केले. त्यानंतर परतावा देण्यास टाळाटाळ करण्यात आली. मुद्दल रकमेची मागणी करण्यात आल्यावर 3.90 कोटी रुपये परत केले. उर्वरित 80 लाख रुपये व कमिशन न दिले नाही. दरम्यानच्या काळात अनुज मित्तल यांनीही संबंधितांविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे समोर आले. त्यामुळे बन्सल यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली. मात्र, त्याची दखल घेऊन कारवाई न झाल्याने त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयात बन्सल यांच्या वतीने ॲड. अभिजीत पुप्पाल यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने गुन्हा नोंदवण्याचे आदेश एमआयडीसी पोलिसांना दिले होते. त्यानुसार सोमवारी (28 जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles