अहिल्यानगर -सफरचंदाच्या दोन वाहनांमधील माल परस्पर विकून शहरातील एका फळ व्यापार्याची तब्बल 18 लाख 99 हजार 932 रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शेंडी (ता. अहिल्यानगर) येथे 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान घडली. संतोष प्रभु ढवळे (वय 46, रा. माळीवाडा, अहिल्यानगर) असे फसवणूक झालेल्या व्यापार्याचे नाव आहे.दरम्यान, याप्रकरणी ढवळे यांनी गुरूवारी (30 ऑक्टोबर) एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यनारायण पांडे (रा. भोपाळ, मध्यप्रदेश), मोईन शेख मुन्सी बागवान, शेख मोहसीन शेख मुन्सी बागवान, शफी बागवान (सर्व रा. बुलढाणा), देंवेंद्र पंडीत (रा. किसनगढ- बास, अलवर, राजस्थान) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. फिर्यादी ढवळे यांचा फळांचा व्यापार आहे. त्यांनी संशयित आरोपींकडे सफरचंदाच्या पेट्यांनी भरलेले (आरजे 14 जीआर 6334 आणि डीडी 01 आर 9942) हे दोन ट्रक पाठवले होते. मात्र, संशयित आरोपींनी संगनमत करून हा माल परस्पर विकून टाकला.यामध्ये एका ट्रकमध्ये 6 लाख 69 हजार 309 रूपयांच्या 505 फुल पेट्या व 72 हाफ पेट्या आणि दुसर्या ट्रकमध्ये 12 लाख 30 हजार रूपयांच्या 703 फुल पेट्या, असा एकूण 18 लाख 99 हजार 932 रूपयांचा माल होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संतोष ढवळे यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे हे करीत आहेत.
सफरचंदाच्या पेट्यांनी भरलेले दोन ट्रक परस्पर विकले; अहिल्या नगरमध्ये व्यापार्याला 19 लाखांचा गंडा
- Advertisement -


