Saturday, February 21, 2026

सुनेत्रा पवार अजितदादांना कुठल्या नावाने हाक मारतात ? सुनेत्रा पवार म्हणाल्या, “घरी मी त्यांना…

सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांना घरी त्या कोणत्या नावाने हाक मारतात? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अजितदादा या नावाने सगळा महाराष्ट्र हाक मारतो आणि ओळखतो. दरम्यान त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी एका खास प्रश्नाचं उत्तर पुण्यातला एका कार्यक्रमात दिलं आहे. पुण्यातल्या शिवाजी नगर या ठिकाणी श्रमण या नवीन विधी कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रम संपताना या प्रश्नाचं उत्तर सुनेत्रा पवार यांनी दिलंय.
बारामती लोकसभा निवडणुकीपासून सुनेत्रा पवार चर्चेत

२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला सर्वाधिक चर्चेतला मतदारसंघ ठरला होता. कारण अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. नणंद विरुद्ध भावजय ही प्रत्यक्ष मैदानात असलेल्या या लढाईकडे शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना म्हणूनही पाहिलं गेलं. ही लोकसभा निवडणूक चांगलीच चुरशीची झाली होती. २०२४ च्या या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंकडून सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. त्यानंतर त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडल्या गेल्या आहेत. सुनेत्रा पवार या त्यांच्या सामाजिक कार्यासाठीही प्रसिद्ध आहेत. २०२३ च्या जुलै महिन्यात अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट घेऊन बाहेर पडले. अजित पवार हे थेट सत्तेत सहभागी झाले. ज्यानंतरची लोकसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. आता सुनेत्रा पवारांनी अजित पवारांबाबत दिलेल्या उत्तराची चर्चा होते आहे.

महाराष्ट्र अजित पवरांना अजितदादा म्हणून ओळखतो, तुम्ही घरी त्यांना काय म्हणता? हे विचारताच सुनेत्रा पवार या मंद स्मित करत म्हणाल्या, “घरीही आम्ही त्यांना दादाच म्हणतो, कारण त्यांना सगळेच दादा म्हणतात. आमच्या लग्नाला ४० वर्षे झाली आहेत.” असं हे दिलखुलास उत्तर सुनेत्रा पवार यांनी दिलं आणि मग त्या मंचावरुन खाली उतरल्या. त्यांच्या या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचं पाहण्यास मिळालं. सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. त्या महाराष्ट्रातील पवार या एका मोठ्या राजकीय घराण्यातील आहेत. त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील हे माजी मंत्री होते, तर त्यांचे भाचे राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील हे उस्मानाबादचे भाजपचे आमदार आहेत. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना दोन मुलं आहेत. जय आणि पार्थ पवार. जय हा कौटुंबिक व्यवसाय चालवतो, तर पार्थ पवार हे राजकारणात आहे. पार्थ पवार यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक मावळ मतदारसंघातून लढवली होती. पण त्यात त्यांना यश आले नव्हते. सुनेत्रा पवार २०२४ पर्यंत सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्या पण समाजसेवेच्या कार्यात त्या सक्रियपणे सहभागी झाल्या होत्या. आता त्यांनी अजित पवारांना घरी त्या काय हाक मारतात या प्रश्नाचं जे उत्तर दिलंय त्याची चर्चा रंगली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles