Friday, February 20, 2026

निवडणुकीच्या तोंडावर मनसेला झटका, अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू असताना मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ भव्य पुतळ्याचे उद्घाटन करताना जमावबंदीचे उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या पुतळ्याचे उद्घाटन करताना अमित ठाकरे यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्रात, शिवछत्रपतींच्या भूमीत महाराजांचा हा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही! आज नवी मुंबईत शाखा उद्घाटनासाठी गेलो असताना समजलं की तब्बल चार महिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त “लोकार्पणासाठी नेता मिळत नाही” म्हणून घाणेरड्या, फाटलेल्या कापडाने झाकून ठेवला आहे. पण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी कुणाला खेळ करू देणार नाही.
https://x.com/MNVS_Adhikrut/status/1990096472990249364/photo/1

महाराजांच्या सन्मानासाठी पुढे येणं ही आमची जबाबदारी होती आणि आम्ही ती पार पाडली. त्यामुळे आजपासून महाराजांचा हा पुतळा विधीवत पूजेसह नवी मुंबईकरांसाठी दर्शनाकरिता खुला असेल, असे आम्ही जाहीर करतो. ही लढाई इथेच थांबणार नाही. महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान कुठेही झाला, तर मनसे त्याला थेट उत्तर देईल. आम्ही कोणाला घाबरणारे नाही आणि शिवरायांसाठी तर अजिबात नाही. जय महाराष्ट्र, जय शिवराय.’मनसेने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अमित ठाकरेंनी म्हटले की, ‘माझी पहिली राजकीय केस शिवछत्रपतींसाठी लढण्याची असेल, तर मला त्याचा आनंदच होईल. निवडणुकांच्या वेळी महाराजांचा जयजयकार करणारे, भाषणातून शिवरायांच्या नावावर टाळ्या घेणारे… यांना पुतळ्याचे लोकार्पण करायला वेळ नाही? हे महाराष्ट्रात घडतंय, हेच लाजिरवाणं आहे.’

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles