अहिल्या नगर शहरात माजी नगरसेवकाच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल वर्षापासून हॉटेलसाठी वापरली चोरून वीज
अहिल्यानगर : नगरमध्ये वर्दळीच्या ठिकाणी हॉटेलचालक एक वर्षापासून चोरून वीज वापरत असल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या पत्नी चैताली यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.महावितरणचे अतिरिक्त अभियंता कार्यकारी राजेंद्र हिरालाल राजपूत यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचे माळीवाडा परिसरातील ब्राह्मणगल्ली
येथे अभिषेक नावाचे हॉटेल आहे. हे हॉटेल त्यांच्या पत्नी चैताली याच्या नावे आहे. मीटरमध्ये फेरफार करून मागील वर्षभरात हॉटेलसाठी AT ५२७९ युनिटचा वापर केल्याचे समोर आले आहे.एकूण १ लाख २३ हजार रुपयांच्या विजेची ही चोरी असून, वीजचोरी केल्याप्रकरणी चैताली बोराटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


