Wednesday, November 5, 2025

अहिल्या नगर मनमाड रोडवरील अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग असा…..

नगर – अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे काम १२ सप्टेंबर पासून सुरु होत असल्याने सदर महामार्गावरील अवजड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेश जारी केले आहेत.
या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक असल्याने होणाऱ्या कोंडीमुळे नागरीकांची गैरसोय होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अहिल्यानगर – मनमाड महामर्गावरील सर्व प्रकारची अवजड वाहतुक पर्यायी मार्गाने वाळविणे आवश्यक होते.

्यानूसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन आदेशात नमुद केल्याप्रमाणे १२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १४.०० वा. पासुन ते २१ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १४.०० वा. पर्यंत अहिल्यानगर मनमाड महामार्गावरुन जाणारी व येणारी सर्व प्रकारची आवजड वाहतुक खालीन पर्यायी मार्गाने वळिण्यात आली आहे.

१) अहिल्यानगर कडुन, मनमाड, मालेगाव, धुळे कडे जाणाऱ्या जड वाहतुकीसाठी मार्ग :- विळद सर्कल दुधडेअरी चौक-शेंडी बायपास नेवासा फाटा कायगाव टोके गंगापुर- वैजापुर मार्गे इच्छित स्थळी जातील.
२) अहिल्यानगर कडुन संगमनेर, नाशिक कडे जाणारे अवजड वाहतुकीसाठी मार्ग :- कल्याण बायपास आळेफाटा-संगमनेर मार्गे मार्गे इच्छित स्थळी जातील. कडे येणारे सर्व अवजड वाहतुकीसाठी मार्ग
३) कोपरगांव कडून अहिल्यानगर :- कोपरगांव- पुणतांबा फाटा वैजापुर मार्गे इच्छित स्थळी जातील. व (कमी उंचीच्या वाहनांकरीता) कोपरगांव पुणतांबा श्रीरामपुर नेवासाफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
४) सिन्नर लोणी मार्गे अहिल्यानगर कडे येणेकरीता पर्यायी मार्ग संगमनेर आळेफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
सदर आदेश शासकीय वाहने, ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles