Friday, February 20, 2026

दादांनी गुलाल उधळलाच! भाजप, शिंदे शिवसेनेला झटका देत 21 जागांवर विजय, संपूर्ण पॅनलला घवघवीत यश

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून अजित पवारांच्या ‘श्री जय भवानी माता’ पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर राहिले. एकूण मतदानाचा कल लक्षात घेता. संपूर्ण पॅनल विजयी झाला आहे. रात्री उशिरापर्यंत ही मतमोजणी चालू होती.जिल्हा निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवारी सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. छत्रपती कारखान्याच्या 22681 मतदारांपैकी 16 हजार हून अधिक मतदारांनी मतदान केले. तब्बल 75 टक्के मतदारांनी मतदान केल्याने मतदारांचा उत्साह दिसून आला. या मतमोजणीत पहिल्या टप्प्यापासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील श्री जय भवानी माता पॅनलने आघाडी घेतली. जय भवानी माता पॅनलच्या वतीने पुढील सलग पाच वर्ष अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज जाचक यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. त्यांचा पहिलाच मतदार संघाचा गट होता या गटात जाचक यांनी मोठी आघाडी घेतली आणि त्यानंतर तोच ट्रेंड दिवसभर कायम राहिला.

साधारणपणे प्रत्येक मतदाराला दहा मतपत्रिका होत्या. त्यामुळे एकूण मतमोजणीत तब्बल 1 लाख 60 हजार मते मोजायची होती. त्यामुळे मतमोजणी संथ गतीने सुरू होती. मतमोजणीचा कल लक्षात घेता छत्रपती सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सभासदांनी सर्वोच्च प्राधान्य राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कृती समितीला दिल्याचे दिसून आले. हे करताना कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर व भाजपचे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष तानाजीराव थोरात यांनी केलेले मतदानाचे आवाहन मतदारांनी साफ नाकारले.

अजित पवार व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची युती झाल्यामुळे निवडणूक एकतर्फी होईल असे चित्र निर्माण झाले होते. छत्रपती वाचविण्यासाठी निवडणूक महत्वाची असल्यामुळे सभासदांनी पवार -जाचक यांच्या युतीच्या पॅनेलवरती विश्‍वास ठेवून श्री जय भवानीमाता पॅनेलकडे एकहाती सत्ता दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles