नगर तालुक्यातील अंगणवाडीतील मुलांना मिळाली लोहयुक्त बिस्कीट मेजवानी

अंगणवाडीतील मुलांना मिळाली लोहयुक्त बिस्कीट मेजवानी
इंदू केअर फार्माचा नगर तालुक्यातील तीन गावांत उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणार्‍या जेजुरीतील इंदू केअर फार्मा कंपनीने नागली, ज्वारी व बाजरीच्या पिठापासून तयार केलेल्या लोहयुक्त बिस्किटांची मेजवानी नगर तालुक्यातील दशमी गव्हाण, सांडवा व कोल्हेगाव या गावांतील अंगणवाडी मुलांना नुकतीच मिळाली. यावेळी गावातील गरोदर महिला व कुपोषित मुले आणि वृद्धांनाही ही बिस्किटे भेट देण्यात आली. अंगणवाडीतील मुलांना ही बिस्किटांची मेजवानी आवडल्याने इंदू केअर फार्मा कंपनीचे मुख्य वितरक ओंकार एन्टरप्राईजेसचे संचालक नानू वल्लाकट्टी यांच्या हस्ते दशमी गव्हाणचे सरपंच उद्धव कांबळे यांच्याकडे आणखी ही बिस्किटे देण्यात आली.
विविध आजारावरील रुग्णांसाठी आयुर्वेदिक औषधे तयार करणार्‍या इंदू केअर फार्मा कंपनीद्वारे शालेय मुला-मुलींसाठी पोषक बिस्किटांचा आहार तयार करण्यासाठी नानू वल्लाकट्टी यांनी पाठपुरावा केला. मैदा वगळून फक्त नागली, ज्वारी व बाजरीचे पीठ, गुळ व आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या मिश्रणातून या बिस्किटांची निर्मिती करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून व प्रयोगशाळांतून या बिस्किटांची तपासणी करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने या बिस्किटांना मान्यता दिल्याने त्यांचे विक्री-वितरण सुरू करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून या बिस्किटांची भेट गावा-गावातील अंगणवाडी मुलांसह गरोदर माता व वृद्धांना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नगर तालुक्यातील कोल्हेवाडी, सांडवा व दशमी गव्हाण येथील अंगणवाड्यांतून वितरण केल्यावर व तेथील मुलांकडून बिस्किटांना पसंती आल्यावर या गावांतील ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी आणखी बिस्किटांची मागणी केली. ती नुकतीच वल्लाकट्टी यांच्या हस्ते त्यांना देण्यात आली. यावेळी दशमी गव्हाणचे सरपंच उद्धव कांबळे, उपसरपंच बाबासाहेब काळे, माजी सैनिक काशिनाथ काळे, मेजर भाऊसाहेब पवार, दशमी गव्हाणच्या ग्रामसेविका एस. बी. वीर, सांडव्याच्या ग्रामसेविका डी. एम. गायकवाड आदी उपस्थित होते.
नागली, ज्वारी व बाजरी पीठ, गुळ यासह आयुर्वेदिक औषधींतून कॅलरिज व फायबरचा समावेश या बिस्किटांमध्ये असल्याचे वल्लाकट्टी यांनी सांगितले. शासनाद्वारे शाळांतून दिल्या जाणार्‍या पोषण आहार योजनेत या बिस्किटांचा समावेश होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. विविध गावांतील अंगणवाडी बालके, गरीब मुले व गरोदर महिलांना या बिस्किटांचे वाटप करण्याचे नियोजन असून, याबाबत अधिक माहितीसाठी 9405000551 यावर संपर्क साधण्याचे आवाहन वल्लाकट्टी यांनी केले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles