Thursday, September 11, 2025

MPL चे क्रिकेट सामने बघण्यासाठी गेलेल्या मुलांच्या गाडीला अपघात; एकाचा मृत्यू, 12 जण जखमी, अहिल्यानगरमधील घटना

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात भीषण अपघात झाला आहे.आज (9 जून) पहाटेच्या सुमारास क्रूझर गाडीचा अपघात होऊन एक ठार तर 12 जण जखमी झालेत.क्रूझर गाडीने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने गाडीचे छत अक्षरशः उडून गेले.जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीतील 13 मुले MPL अर्थात महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे क्रिकेट सामने बघण्यासाठी पुणे गेले होते.घरी परतत असताना आज पहाटे नेवासा तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावर हा अपघात झाला.जखमींवर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात आज पहाटे अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एक ठार झाला, तर 12 जण जखमी झाले आहेत. याबाबत पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी माहिती दिली.

जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील केसरी स्पोर्ट अकॅडमीतील १३ मुले पुण्यातील गहुंजे येथे एमपीएल क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते. सामना आटोपून बोदवडकडे परतत असताना आज पहाटे ५:१५ च्या सुमारास उस्थळ दुमाला गावाच्या हद्दीत त्यांच्या क्रुझर गाडीने ट्रकला मागून धडक दिली. या धडकेत क्रुझरमधील प्रथमेश तेली या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर वृषभ सोनवणे हा गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर जखमींना तातडीने नेवासा फाटा येथील पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अहिल्यानगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये वृषभ सोनवणे याचाही मृत्यू झाला. अन्य ११ जखमी विद्यार्थ्यांवर नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी ॲम्बुलन्सच्या साहाय्याने जखमींना रुग्णालयात हलवले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हा अपघात परिसरात चर्चेचा विषय बनला असून, स्थानिकांनी महामार्गावरील सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून, पुढील कारवाई केली जाणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles