‘चित्रकूट गुरूकुल’च्या वीर बोटकर याची बहुभाषिक यमक कविता वाचनात विश्वविक्रमी कामगिरी
नगर: चित्रकूट गुरूकुल मधील युकेजीचा विद्यार्थी वीर बोटकर याने बहुभाषिक यमक कविता वाचन करताना विश्वविक्रमी कामगिरी केली आहे. बोटकर याने विविध भाषांतील १७ यमक कविता २ मिनिटे ४० सेकंदात वाचून विक्रम प्रस्थापित केला.
या कामगिरीबद्दल बोटकर याचा सत्कार करण्यात आला. यावेळी साईदीप ग्रुपचे संचालक निलेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या संध्या मेढे, प्राचार्या सारीका आनंद आदी उपस्थित होते. चित्रकूट गुरूकुल संस्थेचे संचालक संजय चव्हाण म्हणाले की, चित्रकूट मध्ये मुलांना शिक्षणाबरोबरच संस्कार दिले जातात. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी आत्मविश्वासाने सहभागी होऊन चांगली कामगिरी करतात. शाळा व पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांतून मुले भविष्यात मोठी झेप घेतील असा विश्वास आहे. बोटकर याच्या पालकांनी शाळेतून मिळणारे प्रोत्साहन, प्राचार्या सारीका आनंद यांचे पाठबळ, परिश्रम यामुळे विद्यार्थी घडत असल्याचे म्हटले.
प्राचार्या सारीका आनंद म्हणाल्या की, अतिशय कमी वयात चित्रकुट गुरूकुलचे विद्यार्थी अभ्यास आणि इतर कलागुणांमध्ये चमक दाखवतात. याठिकाणी मुलांना आनंदी वातावरणात शिक्षण दिले जाते तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. शाळेतील उपक्रमांना पालकांचेही वेळोवेळी सहकार्य लाभत असते.


