कल्याण रोड परिसराचा वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त
विद्युत विभागाकडून वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी नागरिकांचे आ.संग्राम जगताप यांना निवेदन
अहिल्यानगर : कल्याण रोड परिसरामध्ये गेल्या वर्षभरापासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून, सुरळीत राहावा यासाठी नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. कल्याण रोड परिसर हा झपाट्याने विकसित होत, असल्यामुळे या परिसरामध्ये नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यस आहे. ट्रांसफार्मर ची संख्या कमी असल्यामुळे त्यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा होत नसून, तो वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे घरातील विजेवर चालणारे उपकरणे फ्रिज, फॅन, टीव्ही, वॉशिंग मशीन या वस्तू अक्षरशा जळत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते, एखाद्या दिवशी शॉर्ट सर्किटमुळे एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तरी कल्याण रोड परिसराचा वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावे. अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे कल्याण रोड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अॅड. युवराज शिंदे, कुंडलिक आरवडे, शंकर पाटील, सुधाकर बोली, राजेंद्र जगताप, राजेंद्र पाडळे, विराज टाक, विवेक विधाते यांनी केली.
यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी शिष्टमंडळास सांगितले की, अहिल्यानगर शहरामध्ये ट्रांसफार्मर ची संख्या कमी असून बसवण्यासाठी विद्युत विभागाकडे पाठपुरावा केला आहे. त्यांनी देखील महापालिकेकडे जागेची मागणी केली असून, लवकरच ट्रांसफार्मर बसविण्याचे काम केले जाणार आहे. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी विद्युत विभागाचे उपअभियंता यांना फोन करून तातडीने कल्याण रोड परिसरामध्ये जाऊन लाईटचा प्रश्न मार्गी लावून देण्याचे सांगितले.



काही नाही होत तरी पण आज् ४-५ वेळेस लाइट गेलीये, असे किती दिवस चालेल काइ माहिती